कर्मचारी राज्य विमा निगममध्ये भरती निघाली मोठ्या पगाराच्या नोकरीची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ईएसआयसीमध्ये विविध विभागांमध्ये भरती सुरु आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती मोहिमेत ११३ पदे भरली जाणार आहेत. या नोकरीसाठी तुम्ही २० मार्चपर्यंत अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.या नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आणि फॉर्म भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.
या पदांसाठी होणार भरती?
यामध्ये प्रोफेसर, असोसिएटस प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि सिनियर रेजिडेंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे असावी. सिनियर रेजिडेंट पदासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
प्रोफेसर पदासाठी १,२३,१०० रुपये पगार मिळणार आहेत. असोसिएट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७८,८०० रुपये पगार मिळणार आहे. असिस्टेटं प्रोफेसर पदासाठी ६७,७०० रुपये पगार मिळणार आहे तर सिनियर रेजिडेंट पदासाठी ६७७०० रुपये पगार मिळणार आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना विविध भत्तेदेखील मिळणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज तुम्हाला डीन, ईएसआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, ६ वा मजला, नंदा नगर, इंदौर ४५०११ येथे पाठवायचे आहे.
Discussion about this post