कर्मचारी राज्य विमा निगममध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली असून तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. स्पेशलिस्ट ग्रेड २ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची २६ एप्रिल २०२५ आहे. तर काही राज्यांसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख २ मे आहे.
या भरतीच्या माध्यमातून एकूण ५५८ रिक्त जागा भरली जाणार आहे. यामध्ये स्पेशलिस्ट ग्रेड २ पदासाठी १५५ रिक्त जागा आहे. स्पेशलिस्ट ग्रेड २ ज्युनिअर स्केलसाठी ४०३ जागा रिक्त आहेत.
पात्रता
कर्मचारी राज्य विमा निगममधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमडी/एमसीएच / डीए / एमएससी / डीपीएम पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी.
ईएसआयसीमधील नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन रिक्रूटमेंट सेक्शनवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे. त्यासाठी तुम्हाला निर्धारित फॉर्मॅट दिला आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी ७८,८०० रुपये पगार दिला जाणार आहे. याशिवाय तुम्हाला टीए, डीए, एचआरए दिला जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
Discussion about this post