कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच ESIC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. ESIC मध्ये सिनियर रेसिडन्ट्स पदासाठी भरती सुरु आहे. १० पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ३ वर्षाच्या कंत्राटी पदावर ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. कर्मचारी राज्य विमा निगमच्या रुग्णालयात जनरल सर्जरी, पॅथोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, AMANESTHESIA या विभागात भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. उमेदवाराने पोस्ट गॅज्युएशनसहित एमबीबीएस डिग्री प्राप्त केलेली असावी. तसेच एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर २ वर्षांचा पूर्ण केला असावा. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,४२,००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे.ESIC हॉस्पिटल, बिबवेवाडी, पुणे-४११ ०३७ येथे तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. याबाबत सर्व माहिती https://www.esic.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे.२० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
सध्या रेल्वे एनटीपीसीमध्येही नोकरीसाठी भरती सुरु आहे. ११ हजारांपेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदवीधर आणि अंडरग्रॅज्युएट उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीबाबत सर्व माहिती रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.















Discussion about this post