तुम्हीही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजे ESIC मध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे सिनियर रेजिडेंट आणि स्पेशलिस्ट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार esic.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ईएसआयसीमधील या भरती मोहिमेत २४ पदे भती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही कोणत्याही परीक्षेशिवाय होणार आहे. उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे.
सिनियर रेजिडेंट पदासाठी १८ जागा भरल्या जाणार आहेत. स्पेशलिस्ट पासाठी ६ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात MBBS, PG डिप्लोमा, MD/MS डिग्री प्राप्त केलेली असावी.
सिनियर रेजिडेंट पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे असावी. स्पेशलिस्ट पदासाठी कमाल वयोमर्यादा ६९ वर्षे असावे.
वेतन
सिनियर रेजिडेंट पदासाठी उमेदवाराना ६७,७०० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनियर स्पेशलिस्ट पदासाठी १४६२३२ रुपये तर सिनियर स्पेशलिस्ट पदासाठी १७०२०८ रुपये पगार मिळणार आहे. कॉन्ट्रॅक्ट स्पेशलिस्ट पदासाठी ६०,००० रुपये महिना वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठ तुम्हाला २८ जुलै रोजी वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहायचे आहे.
Discussion about this post