सरकारने नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना लाँच केल्या आहेत. यात ई-श्रम योजना 2020 मध्ये सुरू झाली. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. आर्थिक मदतीशिवाय केंद्र सरकारकडून 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो.
गरीब घरातील मजुरांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार, लहान नोकरी करणारे तरुण यांना ई-श्रम योजनेचा लाभ घेता येणार आहे. जे लोक कर भरत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ई-श्रम कार्ड हे कामगार,मजुरांसाठी तयार केले जाते. केंद्र सरकारने जर कोणती योजना सुरू केली तर या कार्डच्या आधारे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. याचसोबत यामध्ये नोंदणी करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाईल.
या योजनेत १६ ते ५९ वय असणारे लोक नोंदणी करु शकतो. नोंदणी झाल्यावर तुम्हाला १२ अंकी युनिक नंबर दिला जाईल. त्याच्या साहाय्याने तुम्ही सरकारच्या अनेक योजनांमध्ये सहभागी होऊ शकता.
ई-श्रम कार्ड साठी असा करा अर्ज
ई-श्रम कार्ड तयार करण्यासाठी eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
त्यानंतर Register या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर आधार कार्डशी लिंक केलेला फोन नंबर टाका. त्यानंतर ओटीपी टाका.
फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा.
सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
नोंदणीसाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असते. अर्ज करणाऱ्याकडे आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक हे कागदपत्रे लागतील.
Discussion about this post