जळगाव । एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना यातच जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे.
तब्बल ६० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत. मविआच्या जागावाटपात एरंडोलची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे शिवसैनिक नाराज झाले होते.
एरंडोल मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटांनी लढवली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्यांसह 50 ते 60 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. अनेक वर्षांपासून शिवसेना लढवत असलेली जागा शिवसेने न लढवता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्यामुळे नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिला. नानाभाऊ महाजन यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र माघार घेत त्यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करत राजीनामे दिले आहेत. व्हॉट्सअपच्या माध्यमातून उद्धव ठाकरे तसेच संपर्कप्रमुख संजय सावंत यांना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे पाठवले.