एरंडोल। पती पत्नीमध्ये होणारे भांडण नवी नाही मात्र यातील काही भांडण विकोपाल देखील जातात. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मधून समोर आलीय.
घरगुती भांडणातुन पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. हर्षदा किरण मराठे (वय-२७, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मयत महिलेचे नाव असून किरण महादू मराठे (वय-३५) असं संशयित आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पतीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
एरंडोल येथील गांधींपुरा भागात हर्षदा मराठे या महिला पती किरण महादू मराठे यांच्यासह वास्तव्याला होत्या. गेल्या काही दिवसांपासून मराठे दाम्प्त्यामुळे कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता वाद उफाळून आला. यात सतांपाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी मारली. यात विवाहिता गंभीर जखमी झाल्या.
अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post