जळगाव । जळगाव जिल्ह्यात गोळीबाराचे सत्र सुरूच असून अशातच जिल्हा पुन्हा गोळीबारने हादरला आहे. एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात ३ नोव्हेंबर रोजी गावठी पिस्तूल हातातून चुकून फायर झाल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सोनू सुभाष बडगुजर (रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास खेडी कढोली गावातील भर चौकात सोनू बडगुजर आणि त्याचा मित्रजितेंद्र किशोर कोळी (रा. खेडी कढोली, ता. एरंडोल) हे मस्करी करत होते. याचवेळी जितेंद्र कोळी याच्या हातात असलेले गावठी पिस्तूल तो हाताळत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि बंदुकीची गोळी सुटली.
ही गोळी सोनू बडगुजर याच्या छातीकडील खांद्यावर लागून तेथेच अडकली. गोळी लागल्याने सोनू गंभीर जखमी झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर जखमी सोनूला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. एरंडोल पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.















Discussion about this post