नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.
ईपीएफओमध्ये डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यानंतर ४५ दिवस म्हणजेच दीड महिन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे.
डेप्युटी डायरेक्टर पदासाठी ७ जागा रिक्त आहे. असिस्टंट डायरेक्टर पदासाठी १८ जागा रिक्त आहे. एकूण २५ पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी डेप्युटी डायरेक्टर पदासाठी ३९१०० रुपयांपर्यंत पगार मिळेल.याचसोबत इतर भत्तेदेखील देण्यात येतील.
ईपीएफओच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे असावी.या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी अधिसूचना वाचावी. त्यानंतर अर्ज आणि त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने पाठवायची आहे. तुम्हाला अर्ज श्री दीपक आर्य, क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त २, प्लेट ए, ग्राउंड फ्लोर, ब्लॉक ३, ईस्ट किदवई नगर, नवी दिल्ली ११००२३ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post