नवी दिल्ली । ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणेजच ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आता एटीएममधून पीएफचे पैसे काढता येणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांना एटीएम कार्ड मिळणार आहे.त्याचसोबत मोबाईल अॅपदेखील लाँच करणार आहे. मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ईपीएफओ लवकरच एटीएम कार्ड लाँच करणार आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी हे एटीएम कार्ड वापरले जाणार आहे. याचसोबत मोबाईल अॅपदेखील वापरु शकतात. मनसुख मांडविया यांनी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे मोबाईल अॅप आणि डेबिट कार्ड हे मे-जूनपर्यंत सुरु केले जाईल. ()
EPFO 2.0 ची आयटी प्रणाली अपग्रेड केली जाईल. EPFO 3.0 मे- जून २०२५ पर्यंत लाँच केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना बँकिंग सेवा मिळू शकणार आहे. यामुळे तुम्ही सोप्या पद्धतीने पीएफचे पैसे काढू शकणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता बँकिंग सुविधा मिळणार आहे. कोणत्याही ठिकाणावरुन म्हणजे एटीएममधून ही सुविधा उपलब्ध होईल, या खात्री करण्यासाठी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेत चर्चा सुरु आहे. ही नवीन सुविधा लागू झाल्यावर ईपीएफओ सदस्य एटीएम कार्ड वापरु शकणार आहे.
पैसे काढण्याची मर्यादा
ईपीएफओ कर्मचारी आता लवकरच एटीएम कार्डच्या माध्यमातून पैसे काढू शकणार आहे. परंतु पीएफचे संपूर्ण पैसे तुम्हाला काढता येणार नाही. पैसे काढण्यासाठी काही मर्यादा लागू केली जाईल.मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
EPF सदस्यांसाठी बँकिंग अॅप
मोबाईल बँकिंग अॅप हे ईपीएफ खातेधारकांसाठीही तयार केले जाणार आहे. या अॅपमध्ये तुम्ही पेन्शन, पीएफ, मासिक योगदान याबाबत सर्व माहिती पाहू शकतात. तुम्ही बँकेच्या अॅपवर सर्व माहिती पाहू शकतात.
Discussion about this post