पुणे : येत्या २५ जून पासून अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच पदवी हॉटेल मॅनेजमेंट, बीएस्सी कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया त्याच दिवशी सुरू होणार असून, उर्वरित अभ्यासक्रमाचे वेळापत्रक पुढच्या आठवड्यात जाहीर केले जाणार असल्याची माहिती राज्य सीईटी सेलने दिली.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाते. मात्र या पूर्वी राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले. मात्र नियोजित वेळेत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी अभियांत्रिकीच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्य सीईटी सेलने अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया शनिवारी सुरू केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर अन्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Discussion about this post