मुंबई : सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली दुपारनंतर उकाडा जाणवत असून यामुळे अनेक जण कुलर एसीचा वापर करताना दिसत आहे. मात्र अशातच टाटा वीज कंपनीच्या निवासी ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे. टाटा वीज कंपनीने केलेली ही दरवाढ येत्या एक एप्रिलपासून लागू होणार आहे. या दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीपेक्षा २४ टक्के जास्त दर टाटा कंपनीच्या वीज ग्राहकांचे असणार आहे.
दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी ही वाढ आहे. परंतु एकूण १०१ ते ५०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठी ही दर वाढ अधिक असणार आहेत. इंधन व अन्य खर्चात वाढ झाली असून एकूण वीज खरेदीमध्ये हरित ऊर्जेचे प्रमाणही आयोगाने ठरवून दिले आहे. त्यानुसारची वीज खरेदी, पायाभूत सुविधा खर्च आदींमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, या दरवाढीस जोरदार विरोध झाल्यानंतर कंपनीने सुधारित दर प्रस्ताव सादर केला होता.आता हे दर वाढविले जाणार आहेत. यामुळे आता ०-१०० युनिटसाठी विजेचे दर ५.३३ असणार आहे. हे दर ५०१ पेक्षा जास्त युनिटसाठी १५.७१ असणार आहे.















Discussion about this post