लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल आता हाती येऊ लागले असून संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशातील अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला आहे. इराणी यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसने यावेळी आपली रणनीती बदलली. या निवडणुकीच्या सुरुवातीला राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, पण अखेरच्या क्षणी ते अमेठीतून आणि बहीण प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने राहुल यांना रायबरेलीतून आणि अमेठीतून सोनिया गांधींचे काम पाहणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले.















Discussion about this post