नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील खुर्चीमाड गावात एक भयानक घटना घडली. ८० वर्षीय एका वृद्ध आदिवासी महिलेवर बिबट्याने हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
तळोदा तालुक्यातील बहुतांश गावे जंगल परिसरात आहेत, यामुळे येथे वन्य प्राण्यांचा वावर कायम पाहण्यास मिळतो. घराच्या बाहेर शौचालयासाठी निघालेल्या वृद्ध महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. बिबट्याने महिलेला ५०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. हल्ला करून अर्धवट खाल्ल्याच्या स्थितीत मृतदेह सापडला.
या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने घटनास्थळी दाखल होऊन वृद्ध महिलेचा मृतदेह शुभविच्छेदनासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर ३३ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.















Discussion about this post