यावल | यावल तालूक्यातील मनवेल येथील एका वृद्धाने घरा शेजारीच असलेल्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. आधार सिताराम पाटील (वय ७६ वर्ष रा. मनवेल) असं आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
याबाबत असे की, आधार सिताराम पाटील यांनी आज रविवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास मनवेल गावातील आपल्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या गुरांच्या गोठयात गळफास घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. मयताचा पुतण्या ज्ञानेश्वर जानकीराम पाटील (वय ४६ वर्ष) यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गळफास घेतलेल्या अवस्थेतून खाली उतरवुन तात्काळ त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करून आधार पाटील यांना मृत घोषीत केले.
या वयोवृद्ध व्यक्तीने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ठ होऊ शकले नाही, दरम्यान मयत आधार पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात डॉ. प्रशांत जावळे यांनी केले असुन, मयताचा पुतण्या ज्ञानेश्वर जानकीराम पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास हेड कॉस्टेबल सिकंदर तडवी हे करीत आहे .















Discussion about this post