मुंबई ।देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला असून यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे एकूण ३९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु यानंतर नाराजीनाट्य समोर येऊ लागले आहे. विशेष शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत आणि अर्जुन खोतकर यांनी तर अधिवेशनात न थांबण्याऐवजी मतदारसंघात माघारी परतण्याचा निर्णय झाला.
शिवसेनेतील अंतर्गत नाराजी समोर आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कठोर निर्णय घेण्याचा विचार केलाय. नाराज असणाऱ्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही, असा थेट इशाराच दिलाय.
अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर नाराज नसल्याचे सांगितले खरे पण तेही नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. दीपक सावंत यांच्या नाराजीचीही राजकीय चर्चा आहे. दोन्ही नेत्यांकडे शिंदेंच्या सरकारमध्ये महत्त्वाची पदे होती. पण फडणवीस सरकारमध्ये या दोन अनुभवी चेहऱ्यांना नाकारण्यात आले. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू आहेत.
शिवसेनेच्या कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळाले?
1. उदय सांमत- कॅबिनेट मंत्री
2. प्रताप सरनाईक- कॅबिनेट मंत्री
3. शंभूराज देसाई- कॅबिनेट मंत्री
4. भरत गोगावले- कॅबिनेट मंत्री
5. दादा भूसे- कॅबिनेट मंत्री
6. प्रकाश आबिटकर- कॅबिनेट मंत्री
7. गुलाबराव पाटील- कॅबिनेट मंत्री
8. संजय राठोड- कॅबिनेट मंत्री
9. संजय शिरसाट – कॅबिनेट मंत्री
10. योगश कदम- राज्यमंत्री
11. आशिष जयस्वाल- राज्यमंत्री















Discussion about this post