मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळली होती. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारबाबत मोठा गोप्यस्फोट केला आहे.
‘तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काही मंत्र्यांना अटक करण्यासाठी षडयंत्र रचलं होतं, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राला मुलाखत देताना हा गौप्यस्फोट केला आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, ‘उद्धव ठाकरे यांनी यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी ही देवेंद्र फडणवीस, गिरिश महाजन आणि आशिष शेलार यांना अटक करणार होते, असेही शिंदे म्हणालेत.
याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाबाबत स्पष्ट केलं की, शिवसेना राज्यात १६ जागांवर निवडणूक लढणार आहे. यात मुंबईतील ३ जागांचा समावेश आहे. राज्यातील जागावाटपांवरून कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही २०१९ साली ४२ जिंकल्या होत्या, तो विक्रमही मोडू, असाही दावा त्यांनी केला आहे.















Discussion about this post