मुंबई । सरपंच संतोष देशमुख हत्याकांड खंडणीप्रकरणातून मारहाण झाल्याचे उघड झाले आहे. असाच प्रकार आता भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने देखील केल्याचे उघड आले आहे. शिंदे यांच्या शिवसेनेच्या कांदिवली विधानसभा प्रमुख लालसिंह राजपुरोहितला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे महायुतीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदिवलीच्या प्रकरणावरून मुंबईतील शिंदे गटातील बड्या नेत्याला मोठा दणका दिलाय. कांदिवली विधानसभा प्रमुख लालसिंह राजपुरोहित यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचा आदेश एकनाथ शिंदेंनी दिलाय.
लालसिंह राजपुरोहितला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे सध्या नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून राजकीय चर्चेला उचलण्यात आले आहे. तर या अटकेनंतर शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजपुरोहितला शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे.
रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी लालसिंह राजपुरोहितला रविवारी (ता.9) अटक केली. त्याच्यावर आणखी एका फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी, राजपुरोहितला खंडणी वसुलीच्या धमकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचा अटकपूर्व जामिन देखील सत्र न्यायालयाने फेटाळला असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
Discussion about this post