ठाणे । राज्यात एकीकडे बीड मधील सरपंचच्या हत्याप्रकणावरून राजकारण तापलं असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, एका तरुणाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रिमिंग करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. त्यानंतर या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर धमकी देणाऱ्या तरुणावर कारवाई करण्याची मागणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून धमकी देणाऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. हितेश धेंडे असं धमकी देणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. हितेश हा ठाण्यातील वरळी पाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, हितेश या आरोपीनं इन्स्टाग्रामवर एकनाथ शिंदे यांना धमकी दिली, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्दांचा वापर केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना गोळ्या घालून ठार मारू अशी धमकी आरोपीनं दिली आहे.
Discussion about this post