मुंबई : राज्यात पोटनिवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दिल्ली दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या दौऱ्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांसाठी जागावाटप, मित्रपक्षांमधील समन्वय तसेच प्रलंबित मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या अंतर्गत अहवालात मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे काही मतदारसंघांमध्ये पक्षाला फटका बसल्याचे समोर आले आहे. हा मुद्दा शिंदे दिल्लीतील बैठकीत मांडणार असल्याची शक्यता आहे.
दिल्लीतील खासदारांच्या बैठकीतही शिवसेनेने आक्रमक भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारविरोधात पसरवल्या जाणाऱ्या ‘फेक नॅरेटिव्ह’ला प्रत्युत्तर देण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचे संकेत देण्यात आले. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताची भूमिका कायम ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
एकूणच, शिंदेंचा हा दौरा केवळ औपचारिक नसून आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.















Discussion about this post