जळगाव । जळगावमध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच राजकारण तापले असताना मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांना पुन्हा डिवचलं असून त्यांच्यात निशाणा साधला आहे. कोण ओळखतो त्या खडसेला? ते सध्या कोणत्या पक्षात आहेच कळत नाही, असे गिरीश महाजन म्हणालेत.
काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगरात आपली ताकद कमी झाल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यांचे बरोबरच आहे. ते काहीही चुकीचे म्हणाले नाहीत. खडसे राष्ट्रवादीचे नेते आहेत. ते असे म्हणत असतील तर त्यांचे बरोबरच आहे.
एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे ही कळत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आता काहीही राहिले नाही. खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केल्याचा दावा केला. ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचे असे त्यांचे सध्या चालले आहे. आत्ता मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र चंद्रकांत पाटील हे वेगळे लढत आहेत.
एकतरी नगरपंचायत निवडून आणून दाखवा
गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना जिल्ह्यातील एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवण्याचेही आव्हान दिले. आता एकनाथ खडसेंचे काहीही शिल्लक राहिले नाही. जिल्ह्यात निकाल लागल्यानंतर कुणाची ताकद किती अर्थात ठाकरे गटाची ताकद किती, काँग्रेसची ताकद किती व शरद पवारांच्या पक्षाची ताकद किती हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी, असे ते म्हणाले.















Discussion about this post