जळगाव । निलंबनाच्या कारवाईनंतर काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी कन्या केतकी पाटील हे भाजपात प्रवेश केला. उल्हास पाटीलांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“डॉ. उल्हास पाटील यांच्या मेडिकल कॉलेज यासह वेगवेगळ्या आस्थापना आहेत. त्यात अनियमित असू शकते, मोठमोठे पैशांचे व्यवहार होतात. त्यामुळे हा काळा पैसा ठेवायचा कुठे? ही भीती असते. या भीतीपोटी डॉक्टर उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
यावेळी एकनाथ खडसे यांनी आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली. “ज्या-ज्यावेळी शरद पवारांना ईडीची नोटीस झाली त्या त्यावेळी सहानुभूतीचे मोठी लाट आली. विरोधी पक्षाचे असल्यामुळे सरकारकडून छळण्याचा प्रकार सुरू आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या यंत्रणांच्या या माध्यमातून विरोधी पक्षांना जाणीवपूर्ण टार्गेट केलं जात आहे. सत्ताधारी पक्षाचे सर्वच स्वच्छ कसे? विरोधकांना नामोहरण करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न आहे”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली.
Discussion about this post