मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना काल हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली.त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केलं.
तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील खडसेंची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली.यावेळी पत्नी मंदाकीनी खडसे, कन्या शारदा खडसे, एकनाथ खडसे यांचे खासगी डॅाक्टर डॅा.अभिषेक ठाकुर यांनी शरद पवारांना तब्बेतीविषयी माहिती दिली
एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आलं. एकनाथ खडसे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने जळगावमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला आणण्यात आलं आहे. एअर अॅम्ब्युलन्समधून खडसे यांना मुंबईत आणण्यात आलं. यावेळी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, कन्या रोहिणी खडसे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक त्यांच्यासोबत होते.
मा.सुप्रियाताई सुळे यांनी बॅाम्बे हॅास्पिटल येथे एकनाथ खडसेंची भेट घेऊन प्रकृतीविषयी माहिती घेतली.
यावेळी पत्नी मंदाकीनी खडसे, कन्या शारदा खडसे, एकनाथ खडसे यांचे खासगी डॅाक्टर डॅा.अभिषेक ठाकुर यांनी पवार साहेबांना तब्बेतीविषयी माहिती दिल
Discussion about this post