जळगाव । गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याचा चर्चा सुरु आहे. मात्र आता एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहणार असून कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं खडसे म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन माहिती दिली आहे. गेले काही दिवसांपासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा अफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे, असं आवाहन खडसे यांनी केलं आहे.
Discussion about this post