जळगाव । राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करणार असून त्यावर जळगावमधील स्थानिक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यातच चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर टोला लगावला आहे.
वरिष्ठांच्या निर्णयानंतर आणि एकनाथ खडसेंची पूर्णता वापसी झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित राहील. खडसे भाजपमध्ये येत आहे. ते रस्त्यात आहेत. हे बॅग भरली आहे. बॅगेत शर्ट ठेवला. ते निघाले… अशा चर्चांना काही अर्थ नाही, असा खोचक टोला मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंवर लगावला आहे.
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवासी करतील, अशी चर्चा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगताना आपण पाहत आहोत. या चर्चेत रंग पूर्ण भरू द्या. नंतर त्यावर बोलणं उचित राहील. एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे आणि ती फक्त चर्चाच राहील अशी शंका आम्हाला आहे. माध्यमांव्यतिरिक्त खडसेंचा भाजपात प्रवेश होणार या विषयाची कुठेही चर्चा नाही, असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.
” अमित शाहांना भेटल्याचा फोटो जुना”
एकनाथ खडसे यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो सात वर्षांपूर्वीचा आहे. एखाद्या जुन्या फोटोला वेगळा संदर्भ देणं, याला काही अर्थ नाही. एकनाथ खडसे लोटांगण घालत असतील तर ते त्यांचा निर्णय घेतील. जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसेंनी पक्षात पुन्हा यावं अशी मागणी नाही, असं मंगेश चव्हाण म्हणाले.















Discussion about this post