जळगाव । राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. खडसेंनी या प्रकरणात भाष्य करत गुलाबरावांनी माफी मागितली, तर मार्ग निघेल, असे संकेत दिले होते. आता यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाच वर्षांपूर्वीच्या प्रकरणासंबंधी अब्रुनुकसानीचा दावा आहे. त्यात विशेष काही नाही. नाथाभाऊ वयाने मोठे आहेत.अनेकदा त्यांना नमस्कार केला आहे. आपण माफी मागावी, अशी त्यांची इच्छा असेल, तर त्यांनी चहाला यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना केले.
नेमकं प्रकरण काय?
फडणवीस सरकारमध्ये खडसे मंत्री असताना, गुलाबराव पाटील यांनी २०१६ मध्ये त्यांच्यावर आरोप केल्यानंतर खडसे यांनी जिल्हा न्यायालयात पाटलांवर ५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. नंतर हा दावा रद्द करण्यात आला. खडसेंनी उच्च न्यायालयात अपील केल्यावर खंडपीठाने तो खालच्या न्यायालयात चालविण्याबाबत निर्देश दिले.
Discussion about this post