जळगाव : लोकसभा निवडणूक लढवान्यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टोला लागवला आहे. खडसे यांना लोकसभेची निवडणूक लढवून दाखवा असं आवाहन करीत तुम्ही दिल्या घरी सुखी राहा असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
खडसे यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहावे मात्र त्यांना माझा सल्ला आहे की ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांनी आनंदात राहावं असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आ
गिरीश महाजन हे गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांच्या आरतीसाठी धुळ्यात उपस्थित होते. राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्षप्रमाणे न वागता एखाद्या नेत्याप्रमाणे वागत असल्याच्या विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा देखील मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात समाचार घेतला.
आता तुमच्या निकालाची वेळ आली आहे तर तुम्हाला त्यांचं वागणं वाकड दिसत आहे का, असा प्रश्न देखील महाजन यांनी उपस्थित करत, त्यांनी कसं बोलावं कसं राहावं हे आता अंबादास दानवे ठरवतील का म्हणत अंबादास दानवे यांच्या वक्तव्याचा महाजन यांनी समाचार घेतला आहे.
Discussion about this post