जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. महायुतीला मतदान केल्या, लाडक्या बहिणींना 200 रुपये किलोनं खाद्यतेल खावं लागेल अशी टीका केली.
दरम्यान, 10, 15, 20 रुपये वाढ करणे ठीक आहे. मात्र, 100 रुपयांवरून दीडशे रुपये किलो तेल गेले आहे. त्यामुळं या सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.
महागाईला आळा घालणं हे सरकारचे काम आहे. मात्र, सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असल्याची टीका खडसे यांनी केली आहे. फोडाफोडीच राजकारण करून यांनी अमाप पैसा कमावल्याचा आरोप देखील खडसेंनी केला.