जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे या दाम्पत्याच्या विरोधात भोसरी जमीन खरेदी प्रकरणात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
पुणे येथील भोसरी जमिन खरेदी घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले होते. शुक्रवारी या प्रकरणात सुनावणीला हजर न राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
आता या प्रकरणात पुढील सुनावणी १३ फेब्रुवारीला होणार आहे. या प्रकरणात शुक्रवारी आरोपनिश्चिती होणार होती. मात्र, एकनाथ खडसे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला होता.













Discussion about this post