जळगाव । महाराष्ट्रातील राजकारणात चार दशकांपासून कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज सोमवारी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली.
यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. तसेच रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे. आपण जसे मला सहकार्य केले, तसे रोहिणीताईंना करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, ही विनंती, अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडली आहे. तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार, हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे. आपण जसे मला सहकार्य केले, तसे रोहिणीताईंना करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.















Discussion about this post