जळगाव । गेल्या मागील काही काळापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यात जोरदार शाब्दिक वार सुरु आहे. दरम्यान, आमदार मंगेश चव्हाण हे एका कार्यक्रमानिमित्त मुक्ताईगरमध्ये एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांना तुमच्या विषयाचं ऑडिट होणार असा इशाला दिला. आता त्यावर खडसे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले खडसे?
एकनाथ खडसे म्हणाले, तुला कोणी अडवले बाबा? सांगतो कशाला? ऑडिट कर, फॉडिट कर, काय करायचं ते कर. मी बापजाद्यांपासून श्रीमंत आहे. तुझ्यासारखा हमाल आणि भंगार विकणारा मी होतो का? मी एका चांगल्या घरचा माणूस आहे. तुला काय ऑडिट करायचं ते कर.
तुला जे ऑडिट करायचं आहे ते कर, आत्ता सरकार तुझे आहे, कुठले ऑडिट करायचं ते कर. तुला ज्या भानगडी करायच्या असतील त्या कर. ईडी लावलीय, आयकर विभाग लावला, आणखी तुला काय बघायचे आहे ते बघ. तुझी काय कुवत आहे? समाजात तुझी किंमत काय? तुला समाजात काय मान्यता आहे?
एवढी शक्ती जरा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लावा. तुमच्यात दम असेल तर कापसाला भाव देऊन दाखवा ना, त्याबद्दल बोलायला तुम्ही तयार नाही. उगाच बाकिच्या भानगडी काय काढत बसता असं खडसे म्हणाले
Discussion about this post