जळगाव । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी कारसेवका करतानाच फोटो शेअर केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही कारसेवेची पत्रिका समोर आणली आहे.
चलो अयोध्या या विश्व हिंदू परिषदेच्या पत्रिकेत एकनाथ खडसे यांचेही नाव असल्याचे नमूद आहे. यापूर्वी कार सेवेवरून एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप रंगले होते. मात्र आता खडसेंनी कारसेवेला गेल्याची एक 34 वर्षापूर्वीचं पत्रकच व्हायरल केलं आहे.
अयोध्येत उद्या राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. या निमित्ताने कारसेवेच्या आठवणीही जाग्या होताना दिसत आहे.
एकनाथ खडसे यांनी 1990मधील एक पत्रिका दाखवली आहे. त्यात आमदार एकनाथ खडसे असा नाथाभाऊंचा उल्लेख आहे. या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील कारसेवकांची नावे आहेत. त्यात नाथाभाऊंचं नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर कारसेवला जात असतानाच फोटो टाकताच खडसेंकडूनही कारसेवक म्हणून उल्लेख असलेली पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे.

काय आहे पत्रिकेत?
खडसेंनी समोर आणलेली ही पत्रिका 34 वर्षापूर्वीची आहे. श्रीराम कार सेवा समिती आणि विश्व हिंदू परिषदेने हे पत्रक काढलं आहे. या पत्रकारवर चलो अयोध्येचं आवाहन करण्यात आलं आहे. या पत्रिकेत 19 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990पर्यंतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर 1990 ते 25 सप्टेंबर 1990 पर्यंत जनसंकल्प दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं.















Discussion about this post