मुक्ताईनगर । गेल्या काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अनेकवेळा खडसेंनी यांनी भाजप नेतृत्वावर निशाणा साधला. अशातच पुन्हा एकदा खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेतृ्त्वावर टीकास्त्र डागलंय.
दरम्यान, भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांनी मला 7 खाती दिली होती असं भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं होते. पण 7 खाती नाहीतर 12 खाती दिली होती असं खडसे म्हणाले.कारण माझ्या कर्तुत्वाने ती खाती मला मिळाली होती, असं खडसे यांनी म्हटलं आहे.
पक्षाला ती बारा खाती देणं परिस्थितीने भाग पाडलं. त्या कालखंडात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मी होतो. देवेंद्र फडणवीस यांनी ही खाती मला दिलेली नव्हती. परिस्थितीनुसार पक्षाने मला ही खाती दिली. भारतीय जनता पार्टीने मला काहीच दिलेलं नाही, असं मी कधीच बोललेलो नाही. पण भाजपमधल्या एक दोन जणांवर माझा रोष आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
महाजनांवर टीकास्त्र
ज्यावेळेस भाजपमध्ये आमदार झालो होतो. तेव्हा गिरीश महाजन भाजपमध्ये कुठेही नव्हते. सरपंच असताना त्यांना मी गल्लोगल्ली फिरवलं. महाजन यांची कोणतीही सभा माझ्या शिवाय प्रचाराची पार पडली नाही. गिरीश महाजन आता मोठे झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या वारस म्हणून गिरीश महाजन यांचं नाव पुढे यायला लागलं आहे. गिरीश महाजन अशा प्रसंगांमध्ये अडकलेले होते की त्या प्रसंगांमधून त्यांना मी बाहेर काढलं त्यांना मी बाहेर काढलं नसतं तर ते महाराष्ट्रातही दिसू शकले नसते, असं म्हणत खडसेंनी टीकास्त्र डागलंय.