जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका झाला होता. दोन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी शरद पवारांसह अनेक नेत्यांनी दवाखान्यात जाणून खडसेंची भेट घेतली.तर दुसरीकडे मात्र, एकनाथ खडसेंच्या प्रकृतीसाठी चक्क शिवसेनेच्या एका आमदाराने देवापुढे हात जोडल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ खडसे यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवाकडे प्रार्थना केल्याचे पाहायला मिळत आहे. माध्यमांशी बोलताना देवाला प्रार्थना आहे की, एकनाथ खडसे यांची तब्येत लवकर बरी होवो, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.















Discussion about this post