जळगाव । निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये प्रवेशाचा मानस उघडपणे बोलून दाखवणारे एकनाथ खडसे यांनी भाजपालाच कानपिचक्या दिल्या आहेत. एक्झिट पोलचा (Exit Poll) निकाल पाहता देशात भाजपला 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे आहे. मात्र राज्यात फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता भाजपाला याचा फटका बसल्याचं विधान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसतय
लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचां निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करावं
राज्यात मात्र फोडाफोडीचे राजकारण आणि शेतकऱ्यांच्या समस्या पाहता जनतेला हे फारसे रुचलेल दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही जागा कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.















Discussion about this post