जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर एकनाथ खडसे आणि भाजप संघर्ष पुन्हा पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत भाजप बद्दल बोलताना जीभ घसरली असून अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने भाजप आक्रमक झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपला कुत्र विचारत नव्हतं, त्यावेळी मी राजकारणात भाजपला जिल्ह्यात मजबूत केले, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले होते. खडसे यांच्या या वक्तव्यावरून भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत.
सध्या बैताल व्यक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अगदी खालच्या थराचे वक्तव्य केले आहे. भाजप ही खडसे यांची मातृ संस्था आहे, ज्या पक्षाने तुम्हाला मंत्री केले तुमच्या परिवाराला इतकी पदे दिली. त्याबाबतीत बोलताना खडसे यांनी विचार केला पाहिजे. एवढ असतानाही तुम्ही भाजपला कुत्रही विचारात नव्हता, असे म्हणत असाल तर याच म्हणण्याप्रमाणे आज तुमची परिस्थिती झाली आहे. या शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एकनाथ खडसेवर निशाणा साधला आहे.















Discussion about this post