जळगाव । भाजपच्या वाटेवर असलेलले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. चार वेगवेगळ्या नंबरवरून त्यांना ही धमकी आली असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहे. वेगवेगळ्या नंबरवरुन खडसेंना धमकीचे फोन आले आहेत. विविध देशातून फोन येत असल्याची एकनाथ खडसे यांनी माहिती दिली आहे. नुकताच अमेरिकेतून धमकीचा फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.धमकीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.
गेल्या दोन दिवस पासून एका अज्ञात फोनवरून छोटा शकीलचे नाव सांगत आपल्याला जीवे मारण्यात येणार असल्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचं खडसे यांनी म्हटल आहे. विदेशातून हे कॉल येत असावे असा अंदाज खडसे यांनी व्यक्त केला असून पोलिस आता त्याचा तपास घेत आहेत.















Discussion about this post