जळगाव । शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत गौप्यस्फोट केला.
एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. नया है वह, इसलिये उछल रहा है. उछलने दो… असे म्हणत खडसे यांनी त्यांच्यावर टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी माझं नाव घेतलं. ते व्यवस्थित दिसतात. त्यामुळेच ते माझं नाव घेऊन बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच यावेळी खडसेंनी देवेंद्र फडणवीस हे कुणामुळे मुख्यमंत्री झाले याचा गौप्यस्फोटच केला. देवेंद्र फडणवीस हे माझ्यामुळेच मुख्यमंत्री झाले. त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये माझा मोठा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष व्हावे यासाठीही मी मोठी मदत केली होती. एवढं करूनही उलट त्यांनी माझा छळ केला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसे यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली असून त्यावर आता फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मी लहान सहान माणूस आहे. माझ्यामागे यंत्रणा लावल्या जातील, मला अडकवले जाईल, माझ्याबाबत असं काही राजकारण होईल याची मला अपेक्षा नव्हती. फडणवीस यांच्यासाठी मी खूप काही केलं. मात्र त्याच्या उलट मला जे काही मिळालं त्याची मला अपेक्षा नव्हती, अशी खंत आणि खदखदही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
Discussion about this post