जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. कारण खडसे लवकरच भाजपत स्वगृही परतणार असल्याचा दावा केला जात आहे.त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
यामुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे. गत काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपत परतणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण खडसे यांनी वेळोवेळी हीच चर्चा फेटाळून लावली. पण आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी सोडून भाजपचे कमळ हातात घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.
याच चर्चेदरम्यान खडसे अचानक दिल्लीला रवाना झाले आहे. मात्र, शरद पवार यांच्या सोबत बैठक असून त्याच बरोबर सुप्रीम कोर्टात देखील काम असल्याने आपण दिल्ली निघालो असल्याचं खडसे म्हणाले.
Discussion about this post