जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपात करणार आहे. . एकनाथ खडसे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. त्यामुळं लवकरच खडसेंची भाजपात घरवापसी होणार अशी शक्यता आहे.
एकनाथ खडसे नुकतेच दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या हायकमांडशी भेट घेटल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालाय भाजपात जायचं असेल तर सर्वांना विश्वासात घेवूनच जाणार असे संकेत देखील एकनाथ खडसे यांनी यानंतर दिले होते.
एकनाथ खडसे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आहेत. तर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे आता रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार हे काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.
Discussion about this post