जळगाव । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावमध्ये सभा पार पडत आहे. या सभेदरम्यान, संबोधित करताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे.हे तिघांचं सरकार, एक सिनियर एक ज्युनिय, दोन बायका फजिती ऐका, असं आहे, असं खडसे म्हणाले आहेत.
ते म्हणाले, अजित पवार जे बोलतात ते करणार नेते आहेत. मात्र आता आता त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही. काय अवस्था केली. आता तुमच्या सहीनंतर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचीही सही घेतली जाते. तुमचा स्वाभिमान गेला कुठे? असा सवाल खडे यांनी अजित पवार यांना केला आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, ”गेल्या एक वर्षांपासून विविध पक्षांच्या सभा या मैदानात होत आहेत. मात्र यापूर्वी एवढी मोठी सभा झाली नव्हती. येवला बीडला सभा झाली, पण त्यापेक्षा अधिक उत्साह इथे जाणवतोय.”
Discussion about this post