जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपात घरवापसी करणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाल्या असून यातच खडसे नुकतेच दिल्लीत गेले होते. दिल्ली दौऱ्यात त्यांनी भाजपच्या हायकमांडशी बैठक झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळं लवकरच खडसेंची भाजपात घरवापसी होईल, अशी शक्यता आहे. या साऱ्या चर्चेवर एकनाथ खडसेंनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणले एकनाथ खडसे?
भाजपत जाण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही विश्वासात घ्यावे लागेल. ती प्रक्रिया अजून आपण केलेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी भाजपत जाणार नाही, असे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांना सांगितले. भाजपत जाण्यासाठी मला कोणाचीही आवश्यकता नसून, माझे पक्षातील वरिष्ठांशी पूर्वीही आणि आताही चांगले संबंध आहेत. पक्ष प्रवेश करायचा असेल तर आपल्याला ज्यांनी मदत केली त्या पक्षालाही विचारात घेतले पाहिजे. असा निर्णय एका क्षणात एका दिवसात त्यासाठी सहकाऱ्यांना होणारा नसतो, असं खडसे म्हणाले आहे.
एकनाथ खडसे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे भाजपच्या विद्यमान खासदार असून भाजपनं रावेरमधून त्यांना पुन्हा लोकसभेचं तिकीट दिलं आहे. एकनाथ खडसे यांनी तब्येतीच्या कारणास्तव पवारांच्या राष्ट्रवादीकडून सूनेविरोधात लढण्यास नकारही दिला आहे. तर नाथाभाऊंनी भाजपात परतण्याचा निर्णय घेतल्यास पक्षही त्यांचं स्वागत करेल असं रक्षा खडसे म्हणाल्या आहेत.
मात्र आता एकनाथ खडसेंच्या भाजप वापसीवर जोरदार चर्चा रंगत असून 3 वर्षांच्या आतच पुन्हा खडसेंची घरवापसी होणार का ? या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 8-10 दिवसांतच स्पष्ट होईल.कारण खडसेंना यायचंच झालं तर रावेरमधल्या रक्षा खडसेंच्या मतदारसंघातील मतदानाआधीच तसा निर्णय घेतला जाईल.
Discussion about this post