भुसावळ । तापमान वाढीच्या काळात रेल्वेने आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे मुंबई ते दानापूर, गोरखपूर दरम्यान आठ पूर्ण वातानुकूलित उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांना भुसावळ येथे थांबा असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोरखपूर छत्रपती – शिवाजी महाराज टर्मिनस गाडीच्या ४ फेऱ्या होतील. त्यात ०११०७ क्रमांकाची गाडी सीएसएमटी (मुंबई) येथून ३० एप्रिल आणि ४ मे रोजी रात्री ११.२० वाजता सुटेल. ती दानापूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पोहोचेल. ०११०८ क्रमांकाची गाडी दानापूर येथून २ आणि ६ मे रोजी दुपारी १ वाजता सुटून मुंबईला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. नाशिक, मनमाड, भुसावळ, इटारसी येथे थांबा आहे.
दरम्यान, सध्या उन्हाळ्याची सुटी सुरू असल्याने गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. अशातच मुंबई ते दानापूर, गोरखपूर दरम्यान रेल्वे प्रशासनाने आठ वातानुकूलित उन्हाळी गाड्या सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे
मुंबई – गोरखपूर विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या
मुंबई – गोरखपूर विशेष या गाडीच्या चार फेऱ्या होतील. यात ०११०९ क्रमांकाची गाडी मुंबई येथून २८ एप्रिल आणि २ मे रोजी रात्री ११.५० वाजता सुटेल. ती गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. दोन फेऱ्या होतील. ०१११० क्रमांकाची गाडी गोरखपूर येथून ३० एप्रिल आणि ४ मे रोजी सकाळी ११.२० वाजता सुटून मुंबईला दुसऱ्या दिवशी रात्री ११.१५ वाजता पोहोचेल. नाशिक रोड, भुसावळ थांबा आहे.















Discussion about this post