राज्यात महिलांवर होणारे अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातच आता पोलीस दलातील अत्यंत धक्कादायक बातमी.. मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
एवढंच नाहीतर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करुन त्यांना गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं.या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलातील अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. महिला पोलिसांच्या या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटेनेची सखोल चौकशी होणार आहे.
मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो, असं अमिष दाखवून महिलांचं शोषण केलं गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन या महिला पोलिसांवर अत्याचार केला गेल्याची माहिती आहे.
या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरु करण्यात आली आहे.















Discussion about this post