भुसावळ । मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामधील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकानजीक लांब पल्ल्याच्या लूप मार्गासाठी वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ३१ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार असून यामुळे आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पॉवर ब्लॉकमुळे रद्द झालेल्या
०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्लारशाह विशेष एक्स्प्रेस (२९ ऑगस्ट), ०११२८ बल्लारशाह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष एक्स्प्रेस (३० ऑगस्ट), १११२१ भुसावळ-वर्धा एक्स्प्रेस (३० ऑगस्ट), १११२२ वर्धा-भुसावळ एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट), २२११७ पुणे-अमरावती एसी एक्स्प्रेस (३० ऑगस्ट), अमरावती-पुणे एसी एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट), ०१३६५ भुसावळ-बडनेरा विशेष पॅसेंजर (३१ ऑगस्ट) आणि बडनेरा-भुसावळ (३१ ऑगस्ट) या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यापूर्वी रद्द घोषित करण्यात आलेल्या सहा रेल्वेगाड्या पूर्ववत धावणार आहेत, त्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमरावती एक्स्प्रेस (३० ऑगस्ट), अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस (३० ऑगस्ट), १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस (३० ऑगस्ट), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (३१ ऑगस्ट), १७६४१ काचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस (३० ऑगस्ट) आणि १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्स्प्रेसचा (३० ऑगस्ट) समावेश आहे. काचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस अकोलापर्यंत धावणार आहे, तर नरखेड-काचिगुडा एक्स्प्रेस अकोला येथून सुटणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली आहे.
Discussion about this post