जळगाव । जळगाव शहरामधील कानळदा रोडवरील के.सी.पार्क परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबार प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलतांना माहिती दिली. यापूर्वी याप्रकरणी परस्पर विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत असे की,जळगाव शहरातील कानळदा रोडवरील के.सी.पार्क येथे शुभम अशोक माने हा आपला भाऊ मयूर माने आणि परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवारी २७ जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मयूर माने हा आपल्या परिवारासह घरी असतांना सात ते आठ तरूणांनी घरासमोर येवून शिवीगाळ व दगडफेक केली. त्यामुळे माने कुटुंबिय घराचा दरवाजा बंद करून घरात गेले. त्यावेळी घराच्या खाली उभे असलेल्या तरूणांनी घरावर दगडफेक केली. त्यानंतर गोळीबार केला. त्यानंतर पसार झाले.
गोळीबाराची घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. गोळीबार प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता चेतन रमेश सुधीर, राजेश बांदल, उमाकांत धोबी, समिर सोनार, लक्ष्मण शिंदे, लखन शिंदे, मयूर माने, शुभम माने या आठ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
Discussion about this post