जळगाव । जळगावातील प्रसिद्ध राजमल लखीचंद अर्थात आर. एल. ग्रुपवर आज ईडीने धाड टाकल्याची चर्चा सुरु असून यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, या ठिकाणी चौकशी केली जात असून मात्र, चौकशी कोणत्या कारणाने सुरू आहे हे अद्याप समजू शकले नाहीय.
जळगावच्या राजमल लखीचंद समूहाच्या सराफ बाजारातील पेढीवर आज सकाळी आठ वाजेपासून सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापा टाकून तपासणी करण्यास प्रारंभ केल्याचे वृत्त आहे. या ग्रुपच्या पेढीसमोर पथकाची चारचाकी वाहने लागली असून अद्याप तरी कुणी याबाबत अधिकृतपणे माहिती दिलेली नाही.
तसेच फर्ममध्ये ग्राहकांना जाऊ दिले जात नसून इतर कर्मचारी देखील बाहेर उभे आहेत.
Discussion about this post