नवी दिल्ली । मनी लॉन्ड्रींग प्रकरण, आर्थिक अनियमितता यामुळे सध्या सध्या देशात विविध राजकीय नेते आणि काही उद्योगपतींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असून अशातच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात मोठी कारवाई केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे जमीन घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रींगमध्ये अडकले आहे. यामुळे ईडीकडून सोमवारी सोरेन यांच्या दिल्ली येथील शांती निकेतन येथील घरासह 3 ठिकाणी छापे मारले. सकाळी 7 वाजेपासून सुरु असलेली ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती. परंतु ईडीच्या टीमला सोरेन मिळाले नाही. यामुळे ईडीने त्यांची BMW जप्त केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन मिळत नसल्यामुळे ईडीने विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.
झारखंडमध्ये हालचालींना वेग
दिल्लीत ईडीची कारवाई मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सुरु असताना झारखंडमध्ये हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार रांचीमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.
Discussion about this post