जळगाव । जळगावमधील सुप्रसिद्ध राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिनांक १७ ऑगस्ट रोजी छापेमारी करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरएल ग्रुपवरील ईडीची कारवाई ४० तासांनंतर संपली असून जळगावच्या इतिहासातील ईडीची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
चोकशी नंतर ईडीने करोडो रुपयांचा मुद्देमाल आणि काही महत्वाची कागदपत्र जमा केली आहे. दोन दिवसापासून जास्त वेळ चालेल्या या छापेमारीत ५० किलो सोन, ८७ लाख रुपये कॅश जप्त करण्यात आली आहे
या कारवाई नंतर माजी आमदार मनिष जैन यांनी मीडिया सोबत संवाद साधला तेव्हा ते म्हणले” ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी आमच्याशी चांगले संवाद साधले. त्यांनी त्याची कारवाई पूर्ण केली आहे. या कारवाईत कुठला राजकीय दबाव होता की नाही हे आता न बोललेलं बरं. त्यांनी जे जे आम्हाला विचारला आम्ही त्यांना ते दिलं आहे. ईडीने मोठ्या प्रमाणावर कागदपत्र आणि दागिने जप्त केले आहेत”. माजी खासदार ईश्वरलाल जैन हे कारवाई झाल्यानंतर म्हणाले ” हि कारवाई राजकीय दबावातून झाली असावी. आमचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. या आधी मी त्याचे समर्थन करायचो या नंतर हि त्याचा सोबतच असेंन ” असे ईश्वरलाल जैन म्हणाले आहेत.
Discussion about this post