सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. एक्स्पोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये ४० रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
विशेष म्हणजेच पदवी पास उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑक्टोबरच्या १३ तारकेचपर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे. या वेळेनंतर केले जाणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) 40
आवश्यक पात्रता : अर्ज कर्ता उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधार असणे अनिवार्य आहे.
वयाची अट: 01 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee:
अर्ज करण्याची मुदतीमध्येच उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC/ST/PwD प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये असून इतर उमेदवारांना अर्ज करताना ८५० रुपयांचे अर्ज शुल्क म्हणून भुगतान करावे लागणार आहे.















Discussion about this post